Abstract: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४, एप्रिल १८९१ रोजो महू येथे झाला. त्यांचे वडील रामजी आंबेडकर सैन्यात नोकरीला होते. खेड तालुक्यातील आंबवडे हे त्यांचे मूळ गाव होय.या गावाच्या नावावरुन त्यांचे आडनाव आंबेडकर असे झाले.त्यांचे वडील निवृत्तीनंतर साता-यास स्थायिक झाले. पदबीचे शिक्षण मुंबई येथील एल्फिस्टन महाविद्यालयात, तर एम.ए (अर्थशास्त्र) ची पदवी अमेरिकतील कोलोंबिया विद्यापीठातून घेतली.या शिक्षणासाठी त्यांना सयाजीराव गायकवाड़ांची शिष्यवृत्ती उपयुकत ठरली. बडोदा संस्थानात नोकरी करीत असताना तेथील सहका-यांनी त्यांना समानतेची वागणूक दिली नाही, म्हूणन त्यांनी नोकरी सोडून मुंबई येथील सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. त्यांनी लंडन येथे एम.एस.सी, डी.एस.सी.या पदव्या घेतल्या. छत्रपती शाहु महाराजांनी त्यांच्या कुटुंबाला या काळात अर्थसहाय्य केले. भारतात आल्यावर त्यांनी राजकीय, सामाजिक कार्यात सहभाग घेतला. मूकनायक बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली. भारतीय राजीधटनेचे ते शिल्पकार होते, येवला येथील जाहीर सभेत ते म्हंटले होते; की “मी हिंदु धर्मांत जन्माला आलो असलो; तरी हिंदु म्हणून मरणार नाही.’’ त्यानुसार १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या असंख्य जातबांधवांसह नागपूर येथे बौध्द धर्माची दीक्षा घेतली. ६ डिसेंबर,१९५६ रोजी या महापुरुषाचे महापरिनिर्वाण झाले. विसाव्या शतकाच्या पूर्वाधात भारताच्या राजकीय, सामाजिक , आर्थिक क्षेत्रात ज्यांनी विचारांचा व कर्तुत्वाचा ठसा उमटवला असे तत्वचिंतक, समाजसुधारक व अर्थतज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जागतिक पातळीवर ओळख आहे." समाजपरिवर्तनाच्या हेतुने जो मनुष्य प्रेरित झालेला असेल आणि त्या दृष्टीने समाजातील अनिष्ट प्रवृत्ती नष्ट करण्याचे काम ज्याने हाती घेतले असेल तोच खरा महापुरुष होय.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या, अध्यायन,अध्यापन व लेखणीची सुरवात समाजशास्त्र,राज्यशास्त्र व अर्थशास्त्रपासुन सुरू झाली होती व त्यांना जमीनदारी, कुळ पध्दती व भुमीहीन मजुर पध्दतीस विरोध असून त्यांनी व्यक्तिस्वंतंत्र्य व कल्याणकारी राज्याचा पुरस्कार आपल्या विचारातून केला.
No Comments.